मुंबई दि. 23 : प्रशासनात काम करत असताना शासकीय कायद्यांची अंमलबजावणी, उद्देश साध्य करणे, शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम शासकीय अधिकारी आणि कर्मचारी करत असतात. शासकीय कामाचा व्याप असल्याने अधिकाऱ्यांना काहीवेळेस ताण-तणावाला सामोरे जावे लागते. मानसिक तणावाबरोबर शारीरिक तणाव विरहित काम करण्यासाठी ‘ताण-तणाव व्यवस्थापन’ या विषयावर गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 ते 7.00 या कालावधीत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत सामान्य प्रशासन विभागामार्फत ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचा ‘ताण- तणाव व्यवस्थापन’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, येथे अधिकाधिक अधिकारी यांनी शासकीय ओळखपत्रासह उपस्थित राहावे. तसेच सर्वांना या कार्यक्रमाचे थेट प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि यु ट्यूब या समाजमाध्यमांवरून पाहता येईल.
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
या लिंकच्या माध्यमातून समाजमाध्यमाद्वारे कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी केले आहे.
000
राजू धोत्रे/विसंअ/