मुंबई, दि. २४ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती, माजी आमदार डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “डॉ. देवीसिंह शेखावत हे उत्तम जनसंपर्क असलेले एक लोकप्रिय नेते होते. अमरावतीचे पहिले महापौर तसेच विधान मंडळाचे सदस्य या नात्याने त्यांनी चांगले काम केले होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. दिवंगत डॉ. देवीसिंह शेखावत यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व श्रीमती प्रतिभाताई पाटील व त्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो”, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
०००