वंदे मातरम्‌ व राज्यगीताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

0
3

विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास वंदे मातरम्‌, राज्यगीताने प्रारंभ

मुंबई, दि. २७ : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. विधानसभेत वंदे मातरम्‌  व महाराष्ट्राच्या राज्यगीताने दुपारी ११.५५ वा. कामकाजास सुरुवात झाली.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह सन्माननीय मंत्री, विधानसभा सदस्य उपस्थित होते.

000

शैलजा पाटील/वि.स.अ/

000

विधानपरिषदेच्या कामकाजास वंदे मातरम्‌ व राज्यगीताने प्रारंभ

विधिमंडळाच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या विधापरिषदेतील कामकाजास वंदे मातरम् आणि जय जय महाराष्ट्र माझा…या राज्य गीताने सुरुवात झाली.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…’ या राज्यगीताने सभागृह दुमदुमले होते.

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून या गीतास राज्य गीत म्हणून मान्यता देण्यात आली आहे. कवी राजा बडे यांनी लिहिलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे गीत सीमा आंदोलनाच्यावेळी मराठी मनाला प्रेरणा देणारे ठरले होते. या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले असून, हे राज्यगीत १.४१ मिनिट अवधीचे आहे.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here