राज्यपालांना विधानभवन येथे मानवंदना

मुंबई दि.२७  : राज्यपाल रमेश बैस यांचे विधानमंडळ येथे आगमनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले.

त्यानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्याच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.