‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात लोककला अभ्यासक प्रा.गणेश चंदनशिवे यांचे उद्या व्याख्यान  

0
9

मुंबई, दि. २७: माहिती वजनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत लोककला अभ्यासक आणि लोककला विषयाचे प्रा.गणेश चंदनशिवे यांचे व्याख्यान प्रसारित होणारआहे. हे व्याख्यान मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक-  https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

२७ फेब्रुवारी  हा  दिवस कवी, साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे. हा दिवसमराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचा एक भाग म्हणून जय महाराष्ट्र कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे प्रा. चंदनशिवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here