राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली सदिच्छा भेट

नवी दिल्ली , २८ : राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज सदिच्छा भेट घेतली .

महाराष्ट्र सदन येथे राज्यपाल श्री. बैस यांची श्री. कोश्यारी यांनी सदिच्छा भेट घेतली. श्री. कोश्यारी यांनी राज्यपाल श्री. बैस यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच राज्यपाल श्री. बैस यांना उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराचे छायाचित्र भेट दिले.

०००