राज्य सेवा (मुख्य) परीक्षेच्या मुलाखतीनंतर दोन तासात गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, दि.२८: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा, २०२१ या परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २७ डिसेंबर २०२२ ते दि. २८ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या.

या मुलाखती पार पडल्यानंतर आज लगेच २ तासांच्या आत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ