मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून आठ महिन्यांत ३८ कोटी ६० लाखांची मदत

0
7

मुंबई, दि.१ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आठ महिन्यांत ४ हजार ८०० रुग्णांना एकूण ३८ कोटी ६० लाख रुपयांची मदत दिली आहे.

जुलै २०२२ मध्ये महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये विक्रमी १० कोटी २७ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री कक्षाकडून देण्यात आली.

राज्यातील सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे, त्यानुसार रुग्णांना दिलासा देण्यासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचे कक्षप्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी सांगितले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here