सांगली दि. 4 (जि.मा.का.) : अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवर रहदारी वाढल्याने या रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणच्या कामास त्या-त्या भागातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज मिरज तालुक्यातील विविध रस्ते रुंदीकरण करण्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी केले.
मिरज तालुक्यातील करोली टी कुकटोळी खंडेराजुरी मालगाव मिरज रस्ता प्रजिमा 56 किमी 10/640 ते 13/840 च्या रूंदीकरणासह सुधारणा करणे, जुनी धामणी, विश्रामबाग, कुपवाड MIDC सावळी, तानंग मालगाव रस्ता प्रजिमा 43 चे रुंदीकरण व सुधारणा करणे व मिरज तालुक्यातील करोली टी कुकटोळी खंडेराजुरी मालगाव मिरज रस्ता प्रजिमा 56 सुभाषनगर ते मिरज रुंदीकरण व सुधारणा करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवर पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत करावीत, अशा सूचना संबधित यंत्रणांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.