मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उद्या स्तन कर्करोग निदान, उपचार जनजागृती रॅली

            मुंबई, दि.७ वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्तन कर्करोग निदान व उपचार जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही जनजागृती रॅली सकाळी ८ वा. काळा घोडा ते सेंट जॉर्जेस रुग्णालयापर्यंत असणार आहे.
वैद्यकीय शिक्षण विभाग आणि नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त स्तन कर्करोग निदान व उपचार याबाबत ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.

000

वि.स.अ./श्रीमती वर्षा आंधळे