मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या फोर्ट येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंशू सिन्हा उपस्थित होत्या.
दरम्यान, उपस्थित सर्व महिलांना उद्योजिका श्रीमती शैलजा वालावलकर यांनी कामाचे व घराचे व्यवस्थापन, ताणतणावाचे व्यवस्थापन व महिलांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले.
तसेच व्यवस्थापकीय संचालक श्री. निंबाळकर व श्रीमती अंशू सिन्हा यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मंडळातील वरिष्ठ अधिकारी डॉ मेधा वाके राजकुमार डांगर श्रीमती सुवर्ण लता कांबळे आणि त्यांनी कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
००००
निलेश तायडे/ससं