पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा व आरोग्य सुविधाचा आढावा घेतला

0
36
सातारा दि.-18 :- सातारा जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक योजनेचा निधी 31 मार्चपर्यंत शंभर टक्के खर्च करावा अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करून आरोग्य विभागाचाही आढावा घेतला.
पालकमंत्री श्री देसाई यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश
 जयवंशी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व विभाग प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधी 100% खर्च करावा अशा सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा निधी 100% खर्च करावा. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी 100% खर्च करण्यासाठी 31 मार्चपर्यंत नियोजनबद्ध काम करावे.
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे या संपाचा आरोग्य विभागावर परिणाम होऊन देऊ नका. शासकीय आरोग्य यंत्रणाकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आरोग्य सुविधा द्यावी. यासाठी बाह्य यंत्रणे कडून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती द्यावी. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांना भेटी द्यावीत. संप काळात एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचनाही पालकमंत्री श्री देसाई यांनी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here