नंदुरबार,दिनांक.19 मार्च,2023 (जिमाका वृत्तसेवा): नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज अवकाळी पावसाने झालेल्या ठाणेपाडा ,आष्टे , सुतारे, अजेपुर, हरिपूर, घोगळपाडा, अंबापुर या अवकाळी पाऊस अन गारपीटग्रस्त नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ.गावित यांनी आज या भागाचा दौरा केला. यावेळी तहसिलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषि अधिकारी स्वप्निल शेळके,मंडळ कृषी अधिकारी सुनील गांगुर्डे, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक शशिकांत गावित, मनीलाल सांबळे यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ.गावित यांनी अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. याभागातील कांदा,केळी,पपई,मका,गहु टोमॅटो व इतर फळ पिकांचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. असेही पालकमंत्री डॉ.गावित यांनी सांगितले.
000