मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम आठ दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री  शंभूराज देसाई

0
7

सातारा दि. 28  – मोरणा गुरेघार प्रकल्पाचे रखडलेले काम येत्या आठ दिवसात मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. मरळी येथील निवासस्थानी पाटण तालुक्यातील पाटबंधारे कामांचा आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते.

यावेळी प्रांताधिकारी सुनील गाडे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह.तू. धुमाळ, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विकास पाटील, उप अभियंता सौरभ जोशी, सहायक अभियंता सागर खरात आदी  उपस्थित होते.

ज्या गावांमध्ये काम करण्यास विरोध आहे. तिथे ग्रामस्थांशी चर्चा करून काम सुरू करण्याच्या सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई  म्हणाले, लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत. उत्तर मांड प्रकल्पाबाबत पाहणी करून तातडीने अहवाल सादर करावा. त्यानुसार प्रकल्पाची मंजुरी तातडीने घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here