केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन

0
7

मुंबई दि. १५:  केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे दोन दिवसीय दौऱ्याकरिता आज सायंकाळी मुंबई येथे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, श्रीमती पूनम महाजन, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या रविवार दि. १६ एप्रिल रोजी मंत्री श्री. शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here