महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, कल्याण पांढरे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.तुपेकर, तहसीलदार आदेश डफळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती शोभा शेलार, जिल्हास्तरीय संरक्षण अधिकारी श्रीमती अश्विनी तांबडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी काम्या कार्तिकेयन हिला २०२१ (माऊंटनर)चा आणि जीया राय हिला २०२२ (पॅरा स्विमिंग)चा प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्काराचे तसेच २०१७-१८ यावर्षीचा जिल्हास्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्कार डॉ. निशा ठक्कर यांना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

राज्य शासकीय सेवेत नवनियुक्त झालेले उमेदवार  किरण शहादेव निळ, अमोल राणू कांबळे, सौरभ सुरेश पाटील आणि विशाल रामराव पेरके यांना जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

०००