कोल्हापूर दि : 6 ( जिमाका ) आजरा व पंचक्रोशीतील नागरिकांना पोलीस ठाण्याची ही नुतन इमारत न्याय देण्यास नक्कीच सहाय्यभूत ठरेल असा आशावाद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला
आजरा शहरात बसस्थानक लगत असलेल्या सुमारे 5 हजार स्क्वेअर फूट इतक्या जागेवर व सुमारे दोन कोटी आठ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन पोलीस इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी होते .
ते पुढे म्हणाले नागरिकांना शक्यतो पोलीस स्टेशनमध्ये येण्याचा प्रसंग येऊच नये आणि तो आल्यास त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक येथील पोलीस प्रशासन निश्चितपणे करेल असे सांगून येत्या वर्षभरात राजस्थानातील जयपूरच्या धरतीवर कोल्हापूरचाही पर्यटन विकास निश्चितपणाने करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आजराच्या नगराध्यक्ष जोत्स्ना चन्हाटे, गडहिंग्लजचे उप विभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले आदी उपस्थित होते .
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, ही नूतन वास्तू लोकांच्या समस्यांची सोडवणूक करेल तसेच या परिसरात पोलिसांना राहण्यासाठी त्यांच्या घरांची निर्मिती होण्याबाबत आपण पाठपुरावा करू.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, आजरा हे डोंगरी भागात येत असल्याकारणाने पोलिसांना, नागरिकांना सुविधा देण्यास अडचण येत असली तरीही येथील पोलीस प्रशासन उत्तम काम करीत आहे काम करीत असल्याचे ते म्हणाले तर कुख्यात आंतरराज्य गुन्हेगार संदीप बिश्नोई टोळीतील काही सदस्यांना मोठ्या शिताफीने आजरा पोलिसांनी अटक केल्याने सांगून त्यांचा आपणाला सार्थ अभिमान असण्याचे गौरोउद्गार पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी काढले.
यावेळी या इमारतीच्या उभारणीत योगदान दिलेल्या ठेकेदारांचा सत्कार मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी दाजी दाईगडे,आजऱ्याच्या उपनगराध्यक्षा श्रीमती जाधव, आजरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे, जयवंत शिंपी यांच्यासह आजरा शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000