स्वातंत्र्यवीर सावरकर यांना राजभवन येथे जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. २८: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आज राजभवन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना, सहसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.