स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.२८: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त मंत्रालय येथे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव प्रकाश इंदलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह मंत्रालय सुरक्षा, स्वच्छता अधिकारी व कर्मचारी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००