मुंबई, दि. १ : ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून यंदा प्रथमच राजभवन येथे ‘तेलंगणा राज्य स्थापना दिन’ साजरा केला जाणार आहे.
राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २ जून) सायंकाळी ५.३० वाजता तेलंगणा राज्य स्थापना दिनानिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२ जून हा तेलंगणा राज्य स्थापना दिवस देशातील सर्व राजभवनांमध्ये साजरा केला जाणार आहे. दिनांक २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती.
राजभवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात ‘जय जय हे तेलंगणा’ नृत्य, ‘बथकम्मा’ व ‘बोनालू’ नृत्याचे सादरीकरण केले जाणार आहे. देशातील सर्व राज्यांच्या सांस्कृतिक परंपरा याविषयी माहिती व्हावी हा आयोजनामागचा उद्देश आहे.
राजभवन तसेच तेलंगणा शासन व फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (F – TAM) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
०००
Maharashtra Raj Bhavan to celebrate
‘Telangana State Formation Day’ on Friday
Maharashtra Raj Bhavan will be celebrating the ‘Telangana State Formation Day’ at Raj Bhavan Mumbai at 5.30 pm on Friday (2 June).
Maharashtra Governor Ramesh Bais will preside over the cultural programme.
This is for the first time that Maharashtra Raj Bhavan will be hosting the ‘Telangana State Formation Day’ function. The Telangana State was formed on 2 June 2014.
The Telangana State Formation Day is being celebrated in all Raj Bhavans in the country as part of the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative. The objective of the programme is to promote harmony and understanding among people about the cultural traditions and languages of other States.
The programme at Maharashtra Raj Bhavan is being organised in association with ‘Government of Telangana’ and the Federation of Telugu Associations of Maharashtra (F – TAM).
000