रायगड येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 2 : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपणही करण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार सुनील तटकरे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले तसेच इतर लोकप्रतिनिधी, मान्यवर तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य गोरगरीब रयतेचे राज्य होते. त्यांनी जातिभेद केला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना पुढे येण्याची संधी दिली. महाराज त्यांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीमुळे लोकप्रिय होते, जनतेची काळजी घेणारा हा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून कारभार करतोय, याचा आम्हाला अभिमान आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना केलेली आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारनेदेखील ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजना सुरु केली आहे. सिंचन वाढीसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले असून जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु केली आहे. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
“छत्रपती शिवाजी महाराजांनी सुशासन, राष्ट्रकल्याण, लोककल्याणाचा मार्ग दाखवला. शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न साकारले. कठीण काळात जनतेत आत्मविश्वास जागवला. सैन्य नेतृत्वाचे गुण त्यांनी शिकवले. राष्ट्र निर्माणाचे व्हिजन दिले. महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांनी आरमाराचे महत्त्व जाणले. त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. आजही जलदुर्ग अढळपणे टिकून आहेत. महाराजांनी एकता आणि अखंडता यांना प्राधान्य दिले. आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाने नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आहे. महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय आहे. महाराजांनी आक्रमकांच्या विरोधात लढाच दिला नाही, तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला. त्यांचे व्यक्तिमत्व अद्भुत होते त्यांनी स्वराज्य ही स्थापन केले आणि सुराज्य ही स्थापन केले. त्यांनी राष्ट्र उभारणीचा व्यापक दृष्टिकोन मांडला. आपल्या सर्वांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा”, या शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या दृकश्राव्य संदेशातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.
नवी दिल्ली येथे छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, “शिवराज्याभिषेक सोहळा आपण अनुभवत आहोत, हे आपले भाग्य आहे. महाराष्ट्र निर्मितीची सुरुवात स्वराज्य स्थापनेपासून झाली. राज्य कसे करावे, हे शिवरायांनी जगाला शिकविले. शिवराय न्यायप्रिय राजे म्हणून अजरामर आहेत. दिल्लीतही शिवरायांचा भव्य पुतळा उभारला पाहिजे, अशी मागणी राज्याच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी केलेली कामे आजही आम्हाला आदर्शवत आहेत. त्यांच्या राज्याभिषेकाने नवी नाणी तयार करण्यात आली, गडकिल्ल्यांना नवे अस्तित्व मिळाले. छत्रपतींची राजमुद्रा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर आणली आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक राजधानी नवी दिल्ली येथे झाले पाहिजे, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याच्या वतीने करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचविण्याचा संकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मनामनात पोहोचवण्याचा संकल्प आपण केला आहे. यापुढील काळात किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्य शासन खंबीरपणे शिवराज्याभिषेक समितीच्या पाठीशी राहिल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जगदंब तलवार देशात आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. महाराजांच्या जीवनावरील गॅझेटीयर सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. याशिवाय, तंजावर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अभ्यास होण्यासाठी पाच कोटी रुपये दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्याचा आदर्श जगभरातील लोकशाही मानणाऱ्या देशांनी घेतला आहे.
शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्ष सोहळ्यानिमित्त राज्यभर वर्षभरात विविध कार्यक्रम होणार असून त्याचा प्रारंभ 1 जूनपासून करण्यात आला आहे.
शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस व इतर सर्व मान्यवर यांनी जगदीश्वर मंदिर येथे जाऊन जगदीश्वराचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. होळीचा माळ येथे उपस्थित राहून त्यांनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, ढोलपथकांचे सादरीकरण पाहिले.
तिथीप्रमाणे 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षाच्या दिवशी आज सकाळी ध्वज पूजन, पालखी प्रस्थान त्याचबरोबर ध्वजारोहण तत्पूर्वी झाले.
सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते सप्तसिंधू जलाभिषेक, सिंहासनारोहन मुद्राभिषेक हे विधी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामूहिक राज्यगीत म्हटले गेले. त्यानंतर शासकीय पोलिस मानवंदनाही देण्यात आली.
००००
छत्रपती शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
रायगढ़ में शिवसृष्टि के निर्माण के लिए 50 करोड़ रुपये निधि दिया जाएगा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रायगढ़ पर 350 वां शिवराज्याभिषेक वर्ष समारोह बड़े धूमधाम से मनाया गया
मुंबई, दि. 2 : किले रायगढ़ के तलहरी में 45 एकड़ में शिवसृष्टि के निर्माण के लिए राज्य सरकार की ओर से 50 करोड़ रुपये निधि दिया जाएगा, यह घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रायगढ़ पर हुए 350 वें शिवराज्याभिषेक वर्ष समारोह में की. छत्रपति शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया है, इन शब्दो में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रमों एवं कार्य का गौरव अपने संदेश में किया.
छत्रपति शिवाजी महाराज के 350 वे राज्याभिषेक वर्ष के औचित्य पर राज्य सरकार की ओर से रायगढ़ पर आयोजित भव्य वर्ष समारोह में मुख्यमंत्री बोल रहे थे. इस समारोह में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के संदेश का प्रसारण किया गया.
समारोह में उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, उच्च व तकनीक शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षा मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरगाह व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सांसद छत्रपति उदयनराजे भोसले, सांसद सुनील तटकरे, सांसद सदाशिव लोखंडे, सांसद डॉ.श्रीकांत शिंदे, विधायक भरत गोगावले, लोकप्रतिनिधि, मान्यवर एवं नागरिक बडी संख्या में उपस्थित थे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज का राज्य गरीब-वंचित जनता का राज्य था. उन्होंने जातिभेद नहीं किया. शिवाजी महाराज ने महिलाओं को आगे आने के लिए अवसर दिए. महाराज उनके राज्यकारभार की पद्धति से लोकप्रिय थे. वे जनता का ध्यान रखनेवाले राजे थे. छत्रपति शिवाजी महाराज के आदर्शो को पर हम कामकाज कर रहे है और इस बात का हमे गर्व है. राज्य सरकार ने किसानो को 1 रुपए में पीक बीमा देने की योजना की है. केंद्र सरकार की योजना की तरह राज्य सरकार ने भी ‘नमो शेतकरी सन्मान निधि’ योजना शुरू की है. सिंचन वृद्धि के लिए सरकार ने अनेक निर्णय लिए है और जलयुक्त शिवार योजना फिर से शुरू की है. प्रतापगढ के संवर्धन के लिए सांसद उदयनराजे भोसले की अध्यक्षता में राज्य सरकार प्राधिकरण निर्माण करेगी. मुंबई के कोस्टल रोड को छत्रपति संभाजी महाराज का नाम दिए जाने की बात भी मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस अवसर पर कही.
छत्रपती शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
“छत्रपति शिवाजी महाराज ने सुशासन, राष्ट्रकल्याण, लोककल्याण की राह दिखाई. महाराज ने स्वराज्य का सपना पूरा किया. कठीण समय में जनता में आत्मविश्वास पैदा किया. सैन्य नेतृत्व के गुण उन्होंने दिए. राष्ट्र निर्माण का विजन दिया. महाराज के जीवन के अनेक पहलू है. उन्होंने समुद्री नौदल (आरमार) के महत्त्व को भी समझा. उन्होंने जलदुर्ग का निर्माण किया. आज भी उनके जलदुर्ग डटकर खडे है. महाराज ने एकता और अखंडता को प्राथमिकता दी. आज शिवाजी महाराज के विचारों का प्रतिबिंब ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ इस संकल्पना में दिखाई देता है. छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक दिनने नई चेतना, नई ऊर्जा दी है. महाराज का राज्याभिषेक यह उस समय का एक अद्भुत और विशेष अध्याय है. महाराज ने आक्रमकों के खिलाफ ही लडाई नहीं लढी, स्वराज्य का निर्माण संभव है, यह विश्वास जनता के मन में पैदा किया. उनका व्यक्तिमत्व अद्भुत था. उन्होंने स्वराज्य का के साथ-साथ सुराज्य का भी निर्माण किया. उन्होंने राष्ट्र के निर्माण में व्यापक दृष्टिकोन रखा. हम सभी के समक्ष आदर्श निर्माण करनेवाले छत्रपति शिवाजी महाराज को ‘मानाचा मुजरा” इन शब्दों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने वीडियो संदेश से छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रमों को याद किया.
नई दिल्ली में छत्रपति के राष्ट्रीय स्मारक के निर्माण की मांग
प्रतापगड के संवर्धन के लिए प्रधिकरण का निर्माण राज्य शासन की ओर से किया जाएगा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस अवसर पर कहा कि यह हमारा सौभाग्य है की, हम शिवराज्याभिषेक समारोह का अनुभव ले रहे है. महाराष्ट्र के निर्माण की शुरुआत स्वराज्य के निर्माण से ही हुई. राज्य कैसे करना चाहिए, यह शिवराय ने विश्व को बताया है. शिवराय न्यायप्रिय राजे के रूप में अजरामर है. दिल्ली में छत्रपती शिवाजी महाराज का भव्य स्मारक का निर्माण होना चाहिए, यह मांग राज्य की ओर से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ओर किए जाने की बात उन्होंने कही. छत्रपति शिवाजी महाराज ने साढेतीनसौ साल पहले किया हुआ कार्य आज भी हमारे लिए आदर्शवत है. उनके राज्याभिषेक से नए सिक्के तैयार किए गये है. गढकिलो को नया अस्तित्व मिला है.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस ने बताया कि छत्रपति की राजमुद्रा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नौदल के ध्वज पर लायी है. अब छत्रपति शिवाजी महाराज का राष्ट्रीय स्मारक राजधानी नई दिल्ली में होना चाहिए, और इसकी मांग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ओर राज्य की ओर से की जाएगी.
छत्रपती शिवाजी महाराज के विचार सर्वदूर पहुंचाने का संकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
इस अवसर पर मंत्री श्री. मुनगंटीवार ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज के विचार घरघर में पहुंचाने का संकल्प हमने किया है. भविष्य में किले रायगढ पर मनाये जानेवाले शिवराज्याभिषेक समारोह के लिए राज्य सरकार खंबीरता से शिवराज्याभिषेक समिती के साथ रहेगी. छत्रपति शिवाजी महाराज के समय की ‘जगदंब तलवार’ देश में लाने का प्रयास भी हम कर रहे है. महाराज के जीवन पर गॅजेटीयर आज सांस्कृतिक कार्य विभाग की ओर से प्रकाशित हो रहा है. इसके अलावा तंजावर में छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक बनाने के लिए भी प्रयास जारी है. नई दिल्ली स्थित जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय में छत्रपति शिवाजी महाराज के विचारों पर अध्ययन के लिए पांच करोड रुपए दिये जाने की जानकारी भी उन्होंने इस दौरान दी.
इस अवसर पर सांसद छत्रपति उदयनराजे भोसले ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज ने जनता के राज्य का निर्माण किया. उनका आदर्श विश्वभर के लोकशाही माननेवाले देशो ने लिया है.
शिवराज्याभिषेक दिन के 350 वें वर्ष समारोह के औचित्य पर सालभर समुचे राज्य में विविध कार्यक्रम होंगे और इसकी शुरुआत 1 जून से की गई है.
००००
Chatrapati Shivaji Maharaj gave the vision of Swarajya – Prime Minister Narendra Modi
Rupees 50 crore for construction of ‘ShivSrushti’ at Raigad – Chief Minister Eknath Shinde
Grand ceremony for celebration of 350th year ShivRajyabhishek at Raigad
Mumbai, June 2:- Funds of rupees 50 crores will be given for the construction of ‘Shiva Srushti’ at the foothills of Raigad and Board will be formed for the conservation of Pratapgad This was announced by chief minister Mr Eknath Shinde while celebrating the 350th Shivrajya Abhishek ceremony at Raigad. In his audio visual message, Prime Minister Mr Narendra Modi glorified the work of Chhatrapati Shivaji Maharaj by saying that Maharaj gave the vision of Swarajya -the Self- rule.
Chief Minister Shinde, while speaking at the grand ceremony organized at the Raigad Fort to celebrate 350th year of the Coronation (Rajyahishek) of Chhatrapati Shivaji Maharaj. The audio- visual message by Prime Minister Mr Modi was also broadcast on this occasion.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Cultural Affair Minister Sudhir Mungantiwar, Guardian Minister Uday Samant, Higher and Technical Education Minister Chandrakant Patil, School Education minister Deepak Kesarkar, Rural Development Minister Girish Mahajan, Sports and Mining Minister Dadaji Bhuse, Member of Parliament Chhatrapati UdayanRaje Bhosale, MP Sunil Tatkare, Sadashiv Lokhande, Dr Shrikant Shinde, MLA Bharat Gogavale, public representatives and other dignitaries also graced the occasion in presence of large number of People.
Chief minister Mr Shinde further said that the reign of Shivaji Maharaj was the rule of poor and downtrodden people. He never supported any casteism. He always gave priority for bringing women on the forefront. Mr Shinde Said that Chhatrapati Shivaji Maharaj was popular because of the system he adopted for ruling the state. He was the emperor who cared a lot of his people. He also said that he is happy that the governance of the state in his tenure is marching ahead as per the teachings of Chhatrapati Shivaji Maharaj. He said that he is proud of it.
Mr Shinde said that his government has started the scheme for giving crop insurance to the farmers for just 1 rupee. He said that on the lines of the union government, the state government has also started Namo Shetkari Samman Nidhi scheme. He said that the government has taken various decisions for bringing maximum land under irrigation, adding that the Jalyukt Shivar scheme had also being restarted. He further said that the Authority is going to be formed under the chairmanship of Member of Parliament Udayan Raje Bhosale for conservation of Pratapgarh. He also said that the Coastal Road in Mumbai will be named after Chhatrapati Sambhaji Maharaj.
Chhatrapati Shivaji Maharaj gave the vision of Swarajya Self Governons Prime Minister Modi said “Chhatrapati Shivaji Maharaj showed us the path of good governance, welfare of the nation and welfare of the people. Shivaji Maharaj fulfilled the dream of Swarajya. He created confidence among the people in the hard times. He taught the qualities of leading the Army and gave the vision of nation building. There are many facets to the life of the Maharaj and he was multi- dimensional personality. He recognized the importance of Naval armour. He also created various sea forts. Maharaj gave paramount importance in upholding unity and integration, with priority. Today the reflections of Shivaji Maharaj’s thoughts are seen in the concept of “Ek Bharat- Shreshth Bharat” The Coronation Day celebrations of Chhatrapati Shivaji Maharaj has given a new energy, encouragement and a new insight. The coronation of Maharaj was a special and wonderful chapter in that era. Maharaj not only replied to the aggressors with skills, but also created a confidence in the minds of his disciples and kingdom that the self- rule is possible. His personality was enthralling and he established the Self -Rule or ‘Swarajya’ along with good governance ‘Su-Rajya.’ He had a good vision of nation building and I pay my deep respect to Chhatrapati Shivaji Maharaj who has been inspiration for all.” With these words Prime Minister Mr Narendra Modi lauded the life of Chhatrapati Shivaji Maharaj in his audio visual message.
Will demand National memorial of Chhatrapati in New Delhi- DCM Mr Fadnavis
Speaking on the occasion, Deputy Chief Minister Devendra Fadnavis said that we are lucky enough to experience the Shivrajya Abhishek ceremony. He said that the beginning of formation of Maharashtra started with the establishment of Self- rule or Swarajya. He also said Shivraya showed the entire world how to rule. He said that Shivraya has become immortal as ‘Justice Loving Emperor’. He said that he will demand Prime Minister Mr Narendra Modi to construct a huge statue of Shivraya in Delhi, adding that the work and the rule by Chhatrapati Shivaji Maharaj, that was 350 years back is even a model today. He said that the Rajmudra of Chhatrapati had been embossed on the flag of Navy. Now it is the time that National Memorial of Chhatrapati Shivaji Maharaj be constructed in the National capital of the Nation- New Delhi. He said that he will be making this demand with Prime Minister Narendra Modi.
Thoughts of Shivaji Maharaj to be widely spread- Sudhir Mungantiwar
In his address, the Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar said that the government had pledged to take the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj to each and every person. He said that hereafter, the State government will be standing firm with the Shivrajyabhishek committee for celebrating the Coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort. He said that efforts are on to ensure that the Jagdamba sword of Chhatrapati Shivaji Maharaj is brought in the nation. He said that a Gazetteer based on the life of Shivaji Maharaj is published by the cultural affairs department. Similarly, memorial of Chhatrapati Shivaji Maharaj will be constructed at Tanjavar and efforts have been initiated in this regard. Mungantiwar also informed that the funds of rupees 5 crores has been allocated for starting the course related to the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj at the Jawaharlal Nehru University of New Delhi.
Member of Parliament Chhatrapati Udayan Raje Bhosale said that Chhatrapati Shivaji Maharaj had established the rule of common people and all the nations that believe in democracy, had taken inspiration from it. Notably, various programs will be organized across the state for the entire year on the occasion of celebration of 350thyear of the ShivRajya Abhishek and it had started from 1 of June, 2023.
००००