समान संधी केंद्राचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते उद्घाटन

0
6

बीड, दि. 23,(जि. मा. का.) :- समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते बीड येथील समान संधी केंद्राचे उद्घाटन झाले.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी आदित्य जिवने, औरंगाबाद विभागाच्या  प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे जाधव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीडच्या  उपायुक्त  मकरंद,  सहाय्यक आयुक्त समाज  कल्याणचे एस. एन. चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एम.शिंदे, जिल्हा परिषद बीड तसेच बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य  उपस्थित होते.

बलभीम महाविद्यालय, बीड येथे आयुक्त डॉ. नारनवरे यांच्या उपस्थितीत (दि. 22 जून रोजी) सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) कार्यालय बीड तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित समान संधी केंद्राचे प्रतिनिधी यांची कार्यशाळा, गुणवंत विद्यार्थी, गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर समान संधी केंद्राच्या मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये शुभारंभ प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

शासकीय निवासी शाळा व प्रशासकीय वसतिगृहातील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने दैदीप्यमान यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विभागाच्या वतीने प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, स्वाधार योजना तसेच इतर शासकीय योजना व करिअर मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी महाविद्यालयाच्या स्तरावरच उपलब्ध व्हाव्यात, विद्यार्थी सध्याच्या स्पर्धात्मक परीक्षेला आत्मविश्वासाने व सक्षमपणे सामोरे जाण्यास सिद्ध होतील, असा विश्वास आयुक्तांनी यांनी व्यक्त केला.

मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले, बेरोजगारीचा भाग होण्यापेक्षा ज्ञानाच्या कक्षा रुंदावुन स्वकर्तुत्वावर व रोजगाराच्या सुवर्णसंधी निर्माण कराव्यात त्यासाठी आपण सक्षम झाले पाहिजे. याकरिता सामाजिक न्याय विभागाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, निवासी शाळा, शासकीय वस्तीगृह, स्वाधार योजना या योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. समाज कल्याण विभागाच्या निर्देशानुसार प्रत्येक महाविद्यालयामध्ये उभारण्यात आलेल्या समान संधी केंद्र हे निश्चितच मार्गदर्शकाची भूमिका निभावत असल्याचे आयुक्त डॉ. नारनवरे यांनी सांगितले.

यावेळी सामाजिक विभागाच्या विविध योजनांची यशोगाथाचे लातूर समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक  उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी प्रकाशन केले. या यशोगाथा पुस्तकांमध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनांचे लाभ आणि उद्दिष्ट्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून या यशोगाथेमार्फत जनसामान्य लोकांना याचा लाभ मिळेल, असे आयुक्त महोदयांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here