मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड शहरातील ४३६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

0
6

नांदेड, दि. 25 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत 436 कोटी 48 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. शहरातील मलनि:स्सारण वाहिन्यांच्या बळकटीकरणाच्या कामांसह रस्ते विकास कामांचा यामध्ये समावेश आहे.

चैतन्य नगर येथील शिवमंदीर परिसरात झालेल्या या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नांदेड शहरातील मलनि:स्सारण वाहिन्यांचे बळकटीकरण आणि संलग्नीकरण कामासाठी 329.16 कोटी रूपये निधी मंजूर आहे. यामधून शहरात अद्याप मलनि:स्सारण वाहिनी नसलेल्या भागात नवीन मलनि:स्सारण वाहिनी करण्यात येणार आहे. तसेच ज्या भागातील मलनि:स्सार  वाहिनी नादुरुस्त झाली आहे, तेथे जुनी वाहिनी बदलून नवीन मलनि:स्सारण वाहिनी जोडली जाणार आहे. एकूण 430 किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलनि:स्सारण वाहिनीची जोडणी याद्वारे केली जाणार आहे. तसेच मलनि:स्सारण केंद्रातील विविध यंत्रसामग्रीचा यामध्ये समावेश आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नांदेड शहर रस्ते विकास प्रकल्पातील 107.32 कोटी रूपये निधी मंजूर आहे. या निधीतून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील 182 रस्त्यांची कामे होणार आहेत. या दोन्ही विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here