रौप्य महोत्सवी वर्षात २५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करुया! -पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

0
9

नंदुरबार,दिनांक. 1 जुलै ,2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात पर्यावरणाचा समतोल राखून हरित नंदुरबार करण्यासाठी 25 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करु या, असे  प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज खांडबारा येथे नंदुरबार जिल्हाच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने नंदुरबार वनविभाग, मेवासी वनविभाग,तळोदा,विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते संपन्न झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित,जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, मेवासी वनविभाग,तळोदाचे उपवनसंरक्षक एल.एम.पाटील, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की, परिविक्षाधिन सनदी अधिकारी अंजली शर्मा,यांच्यासह लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री डॉ.गावित   जिल्ह्याच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतांना संबोधित करतांना म्हणाले, आज नंदुरबार जिल्हा हा 25 वर्षांत  प्रदार्पण करीत असून नंदुरबार जिल्हा हा जलद गतीने विकासाच्या दृष्टीकोनातून वाटचाल करीत आहे. या निमित्ताने नंदुरबार जिल्हयात 25 हजार वृक्ष लागवडीचा  उपक्रम वन विभागाने हाती घेतला आहे. या वृक्ष लागवडींच्या माध्यमातून  जिल्ह्यात 25 हजार वृक्ष लावण्यांच्या उपक्रमास आज पासून सुरुवात होत आहे. वन विभाग 25 हजार वृक्ष लावत आहे परंतू या सोबत दुसऱ्या विभागाने  सुद्धा अधिकाधिक झाडे लावण्याचा संकल्प घ्यावा. आदिवासी  विकास विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृहांच्या मोकळ्या जागेत  मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत.

वृक्षरोपण करणे ही काळाची गरज आहे, पुर्वी नंदुरबार जिल्ह्यात मोठया प्रमाणावर वन संपदा होती. आता या वनक्षेत्रात  वृक्षांची संख्या फार कमी झालेली आहे.  यामुळे निसर्गांचे संतुलनात सतत बदल होत आहे.  चांगले आरोग्य राहण्यासाठी हे संतुलन रोखून पुन्हा हरीत नंदुरबार  निर्माण करायचे असेल तर  मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. वृक्षतोडमुळे पर्यावरणातही  बदल होऊन त्यांचे आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असून कॉर्बन डायऑक्साईडचे प्रमाणात अधिक वाढत होत आहे. यावर उपाय म्हणून  मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करावी. नागरिकांनीही या मोहिमेत स्वत:सहभागी होवून मोठया प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊ या आणि हरित नंदुरबार संकल्प पूर्ण करु या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्री डॉ.गावित, जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी वनविभाग तसेच इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी,नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here