शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 19 : गायीच्या दुधाला प्रति लिटर किमान 34 रूपये भाव देण्याचा महत्त्वपूर्ण आणि शेतकरी हिताचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

दुधाला रास्त भाव दिल्याने शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटनेसह विविध संघटनाच्यावतीने मुंबईत आज श्री. विखे- पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान 34 रुपये भाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, यांच्यासह बहुसंख्य दूध उत्पादक, शेतकरी उपस्थित होते.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/