मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २४: आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने रसिकांच्या मनात घर करून राहिलेला, दोन पिढ्यांना जोडणारा ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘जयंत सावरकर यांनी नानाविध चरित्र भूमिका सहजगत्या केल्या. हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी  मालिका या माध्यमातून आपल्या कसदार अभिनयचा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने एक ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0000