मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २ : ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘कला क्षेत्रात नितीन देसाई यांनी स्वतःच्या हिमतीवर आपली ओळख निर्माण केली होती. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्या नितीन देसाई यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांच्या जाण्याने देसाई कुटुंबियांवर आघात झाला आहे. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

०००