कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 2  : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकस्मात मृत्यूचे वृत्त अतिशय दुःखद आहे.  चित्रपट आणि कला क्षेत्रात त्यांनी अतिशय बहुमूल्य योगदान दिले आणि त्यासाठी  अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवान्वित करण्यात आले होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात की, मी मुख्यमंत्री असताना मरीन लाईन्स येथे आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम व्यवस्थेचे त्यांनी यशस्वी संयोजन केले होते. त्यांच्या कला दिग्दर्शनामुळे अनेक चित्रकलाकृतींनी वेगळी उंची गाठली. त्यांचा कलाकृतीला स्पर्श म्हणजे ‘मीडास टच’ होता. असा हा हरहुन्नरी कलावंत आपल्याला अचानक सोडून जाईल, अशी कल्पनाही केली नव्हती. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद प्राप्त होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

००००