ऑलिम्पिक समिती कतारचे अध्यक्ष जोआन बिन हमाद यांचे मुंबईत आगमन

            मुंबई, दि. १६ : ऑलिम्पिक समिती कतारचे अध्यक्ष जोआन बिन हमाद यांचे आज सायंकाळी  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन झाले.

             यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, कतारचे महावाणिज्यदूतांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले, यावेळी राजशिष्टाचार व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तेथून ते  मुंबईतील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

००००