मुंबई, दि. ३१ : भारतीय दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण २० नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नाशिक येथे सशस्त्र सैन्य छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात नि:शुल्क देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील उमेदवारांनी ९ नोव्हेबर २०२३ रोजी मुंबईतील सैनिक कल्याण कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी यांनी केले आहे.
सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सेवा निवड मंडळ एसएसबी या परीक्षेची पूर्व तयारी करून घेते. या पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी मुंबई शहरातील उमेदवारांनी प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन अर्ज संपूर्ण माहितीसह सादर करावा. या परीक्षेत पात्र होण्यासाठी कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी एक्झामिनेशन उत्तीर्ण झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावे. एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेले असावेत. एनसीसी हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे, विद्यापीठ प्रवेश प्रणाली साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी training.pctcnashik@gmail.com व 0253 2451032 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306 या क्रमांकावर संपर्क साधावा.
००००
श्रद्धा मेश्राम/ससं/