केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ – कृषिमंत्री धनंजय मुंडे

0
5

मुंबई दि. २ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास ३१ ऑक्टोबर २०२३ अंतिम मुदत देण्यात आली होती. ३१ ऑक्टोबर पर्यंत सुमारे ४५ हजार ७३१ अर्जदारांनी केळी पिकासाठी विमा योजनेत सहभाग घेतला होता. तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत ठराविक वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे मंत्री श्री. मुंडे यांनी केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

मंत्री श्री. मुंडे यांची ही विनंती मान्य करण्यात आली असून३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्री श्री. मुंडे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेतील सहभाग वाढवून आपला विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावाअसे आवाहनही केले आहे.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here