महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाची मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली पहिली बैठक

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची पहिली बैठक आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीला महामंडळाचे संचालक सदाशिव साळुखेसंजय दशपुते आदी उपस्थित होते.

मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी ब्रिजेश दिक्षित तसेच वरिष्ठ आर्थिक सल्लागार पदी खिमजी पांडव यांची नियुक्ती करण्यात आली. महामंडळाचे अध्यक्ष मंत्री श्री. चव्हाण यांचे संचालक मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पुढील नियोजित कामांचा आढावा घेण्यात आला व त्यादृष्टीने भविष्यातील कामाची रुपरेषा आखण्यात आली.

०००

वंदना थोरात/विसंअ/