‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

बारामती, दि.२६ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पंचायत समिती आवारात भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत’संकल्प यात्रेचा एलईडी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी चित्ररथाची पाहणी केली. ‘विकसित भारत’संकल्प यात्रेची उद्दिष्टपूर्तीकरीता लोकप्रतिनिधी, प्रशासन व लाभार्थ्यांनी मिळून मोहीम यशस्वीपणे राबवावी, असे श्री. पवार म्हणाले. यावेळी लाभार्थ्यांना लाभ पत्राचे वाटपही करण्यात आले.

विकसित भारत संकल्प यात्रा रथ तालुक्यातील एकूण ९९ गावात जाणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामंपचायत स्तरावर उपसमिती गठीत करण्यात आली आहे. ‘विकसित भारत’संकल्प यात्रेचे उद्दिष्टपूर्तीकरीता लोकप्रतिनिधी व लाभार्थ्यांनी सोबत मिळून मोहीम प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी अनिल बागल म्हणाले.

यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्य जय पाटील आदी उपस्थित होते.

000