पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्थेचे दोन वर्षांचे व्यवस्थापन पुरस्कार जाहीर

मुंबई,दि. 17 : राज्याच्या जलनितीनुसार सिंचन व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असण्यासाठी सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. सहभागी सिंचन यशस्वी होण्यासाठी पाणी वापर संस्थाचे व्यवस्थापन कार्यक्रम असणे व पाणी वापर संस्थांनी स्वबळावर सुदृढ (Self Sustainable) होणे आवश्यक आहे. यास्तव पाणी वापर संस्थांच्या व्यवस्थापनाकरीता महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धेचे सन-2017-18 (नववे वर्ष) 2018-19 (दहावे वर्ष) चे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. पुरस्कारार्थी पाणी वापर संस्थांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या पाणी वापर संस्था

2017-18-मोठे प्रकल्प

प्रथम-जानुबाई पाणी वापर संस्था,शिरवली,ता.बारामती,निरा डावा कालवा (भाटघर वीर प्रकल्प),जि.पुणे, द्वितीय-ज्योतिर्लिंग पाणी वापर संस्था,ता.बारामती,निरा डावा कालवा (भाटघर वीर प्रकल्प),जि.पुणे, तृतीय-वारेगाव ग्रुप उपसा जलसिंचन सहकारी संस्था,ता.सिन्नर,दारणा प्रकल्प,ता.इगतपूरी,जि.नाशिक.

कोल्हापूर पद्धतीचा बंधारा

प्रथम-पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था,मेहकर. पेनटाकळी मोठा प्रकल्प,ता.मेहकर,ता.बुलढाणा.

साठवण तलाव व लघु प्रकल्प या अंतर्गत नामांकन प्राप्त झाले नाही.

2018-19 मोठे प्रकल्प

प्रथम-केशवराज पाणी वापर संस्था,अन्वी मिर्झापुर,काटेपुर्णा मोठा प्रकल्प,ता.बार्शिटाकळी,जि.अकोला.

मध्यम प्रकल्प

प्रथम-कै.रंगनाथ गोपाळ पाटील पाणी वापर संस्था,वलखेड,ता.दिंडोरी,वाघाड प्रकल्प,जि.नाशिक.

साठवण तलाव व लघु प्रकल्प या अंतर्गत नामांकन प्राप्त झाले नाही.

000

डॉ.राजू पाटोदकर/वि.सं.अ./17/3/2020