मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात ‘रेशीम शेतीतून समृद्धी‘ या विषयावर रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांची मुलाखत ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात बुधवार, दि. १८ आणि गुरुवार, दि. १९ मार्च रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी ७:२५ ते ७:४०या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
रेशीम उद्योगाचे फायदे, राज्यात रेशीमचे घेतले जाणारे उत्पादन, रेशीमला उपलब्ध होणारी बाजारपेठ, रेशीम शेतीकरिता योजना, रेशीम उद्योगातून मिळणारे परकीय चलन, तुती उद्योगाकरिता प्रशिक्षण केंद्र, तुती शेतीला प्रोत्साहन देण्याकरिता करण्यात येत असलेले प्रयत्न, महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणीसाठी रेशीम धाग्याचा केला जाणारा वापर आदी विषयांची माहिती श्रीमती बानायत यांनी ‘दिलखुलास‘ कार्यक्रमातून दिली आहे.
००००