डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात अभिवादन

नवी दिल्ली, 27 : कृषी क्रांतीचे प्रणेते आणि शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख यांना उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनी अभिवादन केले.

००००

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.224/ दिनांक 27.12.2023