मुंबई, दि. १२ : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी विनम्र अभिवादन केले.
आज मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
०००
काशीबाई थोरात/विसंअ/