मुंबई दि.१३: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू’ चे राष्ट्रार्पण केले. हा अटल सेतू आजपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला आहे. वाहनचालकांनी या सेतूवरून प्रवासाचा आनंद घेताना वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू अशी या अटल सेतूची ओळख आहे. यामुळे, दाक्षिण भारतासह, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा यांचे अंतर कमी होणार आहे. हा सेतू एक देशातील एक प्रमुख अभियांत्रिकी आविष्कार ठरला आहे. या सेतूवरून प्रवास करणे हा आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाचा क्षण असणार आहे, हा क्षण अनुभवताना वाहन वेग मर्यादा लक्षात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करावा.
आपण सर्वांनी सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
०००