‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘विकासपर्वाचे शंभर दिवस’ या मुलाखतीचा दुसरा भाग

0
7

मुंबई,दि.16 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित’जय महाराष्ट्र’कार्यक्रमात’विकासपर्वाचे शंभर दिवस’या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. या कार्यक्रमात’द फ्री प्रेस जर्नल’चे राजकीय संपादक संजय जोग, ‘दै.लोकसत्ता’चे राजकीय संपादक संतोष प्रधान व’दै.सकाळ’चे मुख्य प्रतिनिधी संजय मिस्कीन यांचा सहभाग असलेली मुलाखत’जय महाराष्ट्र’कार्यक्रमात मंगळवार दि.17मार्च2020रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी7.30ते8.00या वेळेत प्रक्षेपित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात होत असलेला दिशा कायदा,महिला व बालकल्याण विकास विभागाच्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय,पर्यटन विकासाच्या अनुषंगाने घेतलेले निर्णय,पाच दिवसांचा आठवडा,पोलीस विभागाचे सक्षमीकरण,मुंबई24तास,आरोग्य विभागाचे सक्षमीकरण हा उपक्रम आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.जोग,श्री.प्रधान व श्री.मिस्कीन  यांनी’जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून दिली आहे.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here