जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत

मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘विश्व मराठी संमेलन’ या विषयावर शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. या अनुषंगाने दि. 27 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत नवी मुंबई येथे दुसऱ्या ‘विश्व मराठी संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेचा वैश्विकस्तरावर प्रचार होण्यासाठी या संमेलनाच्या माध्यमातून विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई येथे तीन दिवस होणाऱ्या या संमेलनाचे नियोजन, त्याचा मुख्य उद्देश तसेच कार्यक्रमांची रूपरेषा याबाबत मंत्री श्री. केसरकर यांनी  ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्री श्री.केसरकर यांची मुलाखत शनिवार दि. 27 आणि सोमवार दि. 29 जानेवारी 2024 रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 26 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/स.सं