सोलापूर, दि-२७ (जिमाका ):- पारंपरिक लोककलांनी व ढोल, ताशा, लेझीम, भगवे – लाल फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि नाट्य कलाकारांच्या उपस्थितीत १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी आज बलिदान चौक ते नॉर्थ कोट मैदान पर्यंत निघाली.
यावेळी नाट्य दिंडीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील,अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, सिने अभिनेता तथा विश्वस्त मोहन जोशी, प्रा. शिवाजी सावंत, कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार, सहकार्याध्यक्ष राजा माने, प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके तसेच विविध मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार सहभागी झाले होते
नाट्य दिंडीत नाट्य कलावंतांसोबत तसेच पारंपरिक लोक कला असलेल्या वासुदेव, पोतराज, गोंधळी, बहुरूपी तसेच मानाचे नंदीध्वज, वारकरी, बहुरंगी वेशभूषेतील लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती. ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी सोलापूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
00000