माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता महत्त्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
7

मुंबई, दि. ६ : संकेतस्थळाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना विभागाची सविस्तर माहिती उपलब्ध होत असून माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता महत्त्वाची असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जलसंपदा विभागांतर्गत पाच महामंडळाकरिता नव्याने विकसित करण्यात आलेल्या संकेतस्थळांचा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात येथे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.   

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नागरिकांना विविध माहिती घरबसल्या उपलब्ध होण्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे संकेतस्थळ, सध्या नागरिकांना माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून माहिती हवी असते.  संबंधितांना संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असल्यानचे कळविल्यास त्यांचा वेळ आणि श्रमाची बचत होईल.

सुरक्षितेच्या दृष्टीने महत्वाची माहिती वगळता सर्व अद्ययावत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात यावी. संकेतस्थळांची देखभाल नियमित करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. विभागाचा विकासाचा वेग असाच वाढता ठेवण्यात यावा, अशा सूचना श्री. फडणवीस यांनी यावेळी केल्या.

 

जलसंपदा प्रकल्प नियोजन हे नदी खोरे निहाय केले जात असल्याने राज्यातील जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ५ पाटबंधारे विकास महामंडळ यांची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळ कामाचा व्याप हा मोठा असल्याने प्रत्येक महामंडळ करत असलेल्या कामकाजाविषयी माहिती सामान्य नागरिकांपर्यंत होण्यासाठी स्वतंत्र संकेत स्थळ आवश्यक असल्याचे निदर्शनास आले असल्याचे जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी श्रीमती अलका अहिरराव, उपसचिव यांनी संकेतस्थळांविषयी सविस्तर सादरीकरण केले, यामध्ये सदर संकेतस्थळाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना खालील माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

➢        प्रकल्पातील पाणीसाठा

➢        पूर रेषा

➢        पूर नियंत्रणासाठी सोडण्यात येणाऱ्या विसर्गबाबतची माहिती, Alert levels/ danger levels at key points

➢        संघटन तक्ता

➢        संपर्क निर्देशिका

➢        प्रकल्पांची छायाचित्रे

➢        महामंडळांतर्गत प्राप्त प्रशासकीय मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश

➢        महामंडळाचा कायदा

➢        पाणी आरक्षण सद्य:स्थिती

➢        उपसा परवाना धारकांची यादी

➢        नियामक मंडळ ठराव

➢        माहिती अधिकार अंतर्गत स्वयं प्रेरणेने प्रकाशित करावयाची माहिती

➢        नागरिकांची सनद

➢        महामंडळ परिपत्रके

➢        वार्षिक अहवाल

*          संपूर्ण जलसंपदा विभागाची माहिती सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाचे संकेतस्थळ   wrd.maharashtra.gov.in. वर या पाचही महामंडळांच्या  websites link  करण्यात आल्या आहेत.

*संकेत स्थळाचे उद्देश व फायदे*

➢        सदर माहिती सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध करुन देणे

➢        माहितीसाठी होणारा पत्र व्यवहार कमी करणे

➢        विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणणे

➢        विभागाचे सामान्य नागरिकांप्रती उत्तरदायित्वामध्ये वाढ करणे

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here