नांदेडच्या तख्त सचखंड प्रबंधन कमिटीचे सदस्य शीख समुदायातीलच राहणार

मुंबई,दि. 9, नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब या गुरुद्वारामध्ये राज्य शासनाच्या नवीन निर्णयामुळे जी व्यवस्थापकीय समिती असेल त्यामध्ये सर्व सदस्य हे शीख (केशधारी) समुदायातीलच असतील असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

5 फेब्रुवारी, 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दी तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा अधिनियम 2024 अस्तित्वात आणण्यास मान्यता देण्यात आली. या अधिनियमाबाबात काही संस्था व व्यक्ती यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, या अधिनियमातील तरतूदीनुसार व्यवस्थापकीय समितीमधील सर्व सदस्य हे शीख (केशधारी) समुदायातील असणार आहेत. शीख समुदायाचे अधिकारी, तज्ज्ञ, विचारवंत आणि समाजाच्या विविध क्षेत्रात विशेष योगदान असलेल्या व्यक्तींचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. शीख (केशधारी) समुदायाच्या बाहेरील कोणतीही व्यक्ती या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य असणार नाही.

तसेच या समितीच्या अध्यक्ष निवडीबाबतही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष हे शीख (केशधारी) समुदायातीलच असतील. तसेच शीख समुदायाच्या नियमानुसारच या व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात येणारी व्यक्ती केशधारी असेल. नवीन समितीमध्ये एकूण 17 सदस्य असतील. त्यामध्ये 3 सदस्य निवडणुकीने निवडले जातील. दोन सदस्य शिरोमणी व्यवस्थापन समिती, अमृतसर यांच्याकडून तर राज्य शासनाद्वारे नियुक्त सदस्यही असतील.

या अधिनियमाबाबतचे विधेयक लवकरच विधानसभेमध्ये मांडण्यात येणार असून त्यावर चर्चा झाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. तरी या अधिनियमाबाबत पसरवण्यात येत असलेल्या चुकीच्या प्रचारास बळी न पडता शीख समुदायातील नागरिकांनी कोणतीही शंका मनात धरू नये, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.

00000

तख्त सचखंड, नांदेड प्रबंधन कमिटी में सिख समुदाय के ही रहेंगे सदस्य

 

मुंबई, 9 फरवरी : नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब में राज्य सरकार के नए निर्णय के कारण, जो प्रबंधन कमिटी होगी, उसमें सभी सदस्य सिख समुदाय सें ही होंगे, ऐसा स्पष्टीकरण राज्य सरकार के माध्यम सें किया जाता है.

5 फरवरी को मंत्रिमंडल में निर्णय पश्चात कुछ संस्थाओं, व्यक्तीओं द्वारा कुछ सवाल उठाए गए. लेकिन, इस नए अधिनियम कें पश्चात भी प्रबंधन कमिटी में सभी सदस्य सिख समुदाय सें ही होंगे. सिख समुदाय के अधिकारी, विशेषज्ञ, विचारवंत और समाज के भिन्न क्षेत्र में अतुलनीय योगदान देने वाले सिख समुदाय कें नागरिक ही होंगे. सिख समुदाय के बाहर के लोग इस प्रबंधन कमिटी में नहीं रहेंगे. कोई गलत प्रचार पर ध्यान ना दे या किसी संभ्रम में ना रहें, ऐसा अनुरोध राज्य सरकार की ओर सें किया गया है. इस संदर्भ में बिल जल्द ही विधानसभा के पटल पर रखा जाएंगा और चर्चाउपरांत वहाँ इसका निर्णय लिया जाएगा. राज्य मंत्रिमंडल में लिए गए निर्णयानुसार, नया बोर्ड कुल 17 सदस्यों का रहेंगा, जिसमें 3 चुनाव सें, 2 सदस्य शिरोमणी प्रबंधक कमिटी, अमृतसर सें और राज्य सरकार द्वारा नियुक्त भी सदस्य होंगे.

 

०००

 

Only the members belonging to the Sikh community will be accommodated in Takht Sachkhand Nanded Management Committee

Mumbai, February 9:- Following the new decision of the state government, all the members in the Management Committee of Nanded Sikh Gurudwara Sachkhand Shri Hazur AbchalNagar Sahib will be from the Sikh community. Only This clarification had been given by the state government.

Some questions were raised by few institutions and people after the decision of the state cabinet was taken on 5th of February 2024. But even after the pronouncement of this new Act, the management committee members will be all from the Sikh community. They will be the ones who are officials, experts, philosophers, thinkers of the community and have a lot of contribution in different fields of the society.

The people who do not belong to the Sikh community will not be accommodated in the Management Committee. The government has clarified and appealed that no one should pay heed to the false campaign that is spreading a dilemma amongst the people. A bill will soon be tabled in the Legislative Assembly in this regard and the decision will be taken after detailed discussion on it. According to the decision taken by the state cabinet, there will be in all 17 members of the new Board. Three of them will be elected, two will be from Shiromani Prabandhak Committee Amritsar and there will be some appointed by the state government.

००००