‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मध केंद्र योजना’ व ‘महा खादी एक्स्पो २०२४’ विषयावर मुलाखत

0
10

मुंबई, दि.9 :महाराष्ट्र खादी व  ग्रामोद्योग मंडळामार्फत मुंबईत ‘महा खादी एक्स्पो 2024’  चे आयोजन 16 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून मुंबईतील नागरिकांना वस्त्र, वस्तू, स्वाद आणि मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेता येणार असून हा ‘महा खादी एक्स्पो 2024’ लघु उद्योजक व ग्राहकांना जोडणारा दुवा ठरणार असल्याचे मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सांगितले.

राज्यात खादीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि ग्रामीण उद्योजकांच्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने 16 ते 25 फेब्रुवारी दरम्यान वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स जिटेक्स ग्राऊंड 5 येथे ‘महा खादी एक्स्पो 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात लघु उद्योग विकास महामंडळ, उद्योग संचालनालय व भारतीय लघु उद्योग विकास बँक तसेच एक जिल्हा एक उत्पादन यातील उद्योजकांचा सहभाग असणार आहे. मुंबईत परपडणाऱ्या ‘महाखादी एक्स्पो 2024’ चे नियोजन, यातील बाबींचा समावेश, मंडळाच्या ‘मध केंद्र’ योजनेला मिळालेली मान्यता, ही योजना, योजनेची अंमलबजावणी याबाबत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात आर.विमला यांची मुलाखत सोमवार दि.12, मंगळवार दि.13 आणि बुधवार दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here