मुंबई, दि. 26 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडला.
दिवंगत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर गजानन जोशी, तसेच माजी विधानपरिषद सदस्य राजेंद्र सुखानंद पाटणी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दिवंगत सदस्यांच्या कार्याला उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उजाळा दिला. यावेळी सर्व सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.
००००
दत्तात्रय कोकरे/विसंअ