उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे लोकार्पण

0
9

बारामती, दि. १४: प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ आणि बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच उघडा मारुती परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या सदनिका गृहप्रकल्पाचे भूमिपूजनदेखील उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे संचालक अनिल कानिटकर, संचालक प्रवीण कोळी, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव, किरण गुजर, बिरजू मांढरे आदी आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील गृह प्रकल्प ५ हजार ५०० चौ.मी. भूखंडावर उभारण्यात आला असून त्याअंतर्गत एकूण १०० सदनिकेचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सदरच्या सदनिका १ बीएचके आकाराच्या असून त्याचे क्षेत्रफळ २८.१ चौ.मी. इतके आहे. संपूर्ण गृह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ९ कोटी ६६ लाख रुपये खर्च झाला आहे.

उघडा मारुती परिसरात सुमारे ५ हजार ११३ चौ.मी भूखंडावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पात एकूण ११४ सदनिका आहेत. सदरच्या सदनिका १ बीएचके आकाराच्या असून त्याचे क्षेत्रफळ २८.३१  चौ.मी. आहे. गृह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १४ कोटी ८३ लाख रुपये खर्च येणार आहे.

या दोन्ही गृह प्रकल्पामुळे बारामती परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध होणार असून त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या शहरातील व्यापारी संकुलाचे लोकार्पण करण्यात आले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here