सोलापूर, दि. 1 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख,जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आदर्श तलाठी पुरस्कार वितरण-
महाराष्ट्र शासनाकडून सन 1996-97 या वर्षापासून महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील एका तलाठ्याला आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन 2023-24 वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून श्रीमती पल्लवी पंडित बागुल, तलाठी, अप्पर तहसील कार्यालय मंद्रूप,उपविभागीय कार्यालय सोलापूर क्रमांक दोन यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. प्रमाणपत्र व 5 हजार रुपये धनादेश देऊन हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते तलाठी श्रीमती पल्लवी पंडित बागुल यांना देण्यात आला.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये ध्वजारोहण संपन्न-
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65 व्यादिनानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्या हस्ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या छतावर आज सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, तहसीलदार सरस्वती पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या सह प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.