मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ८२० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

0
10

मुंबई, दि. १४ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत 820 मतदारांनी गृह मतदान केले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ 751 तर दिव्यांग 69 मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली आहे. 15 तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदान घेण्यात आले. 819 पैकी 751 ज्येष्ठ नागरिक आणि 76 पैकी 69 दिव्यांग अशा 820 मतदारांनी मतदान केले आहे. 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये  धुळे मतदारसंघासाठी 19 मतदारांनी टपाल पद्धतीने मतदान केले. दिंडोरीसाठी 5 मतदारांनी, नाशिकसाठी 27, पालघरसाठी 240, भिवंडीसाठी 150, कल्याणसाठी 64, ठाणेसाठी 230, मुंबई उत्तरसाठी 553, मुंबई उत्तर पश्चिमसाठी 196, मुंबई उत्तर पूर्वसाठी 161, मुंबई उत्तर मध्यसाठी 340, मुंबई दक्षिणसाठी 156 तर मुंबई दक्षिण मध्यसाठी 175 असे एकूण 2316  मतदारांनी टपाली मतदान केले आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here