मुंबई, दि. 19 : महिला बचत गटांना रोजगार निर्मिती व उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मविम) माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीला माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, मविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ग्राम विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहाय्याने एकाच छताखाली आणण्याबाबत विविध विभागांशी समन्वय करून निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.
००००
काशीबाई थोरात/विसंअ/