मुंबई, दि. ९ : जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर आणि शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ०९ जुलै, २०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII), पे टीएम, महिन्द्रा एन्ड महिन्द्रा प्रा.लि., हिताची केश मॅनेजमेंट सर्व्हिसेस, रॅण्डस्टॅड इंडिया प्रा.लि., शिंडलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या विविध क्षेत्रातील २२ उद्योजक /प्लेसमेंट एजन्सींनी सहभाग घेतला. उद्योजकांनी टेक्नीकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रीशीयन, टेलीकॉलींग, बॅक ऑफीस, अप्रेंटीस, मशिन ऑपरेटर, डिजीटल मार्केटिंग, डिजीटल ऑपरेटर, आय टी इंजीनियर, फायनान्शीयल ॲडव्हायजर, सुपरवायझर या सारख्या १८४७ पदाकरिता प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या, तसेच उपस्थित ५ शासकीय महामंडळानी स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणाऱ्या योजनांची माहिती उमेदवारांना दिली.या मेळाव्यात ३८० उमेदवारांनी सहभाग घेतला असून, उद्योजकांकडून ३२ उमेदवारांची प्राथमिक निवड आणि ५ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. या मेळाव्यास जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्रीमती शंभरकर, प्राचार्य श्री. संजय गोरे, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे उपस्थित होते.
०००
संध्या गरवारे/विसंअ/